मुंबई ऊर्जा प्रकल्प; शेतकऱ्यांचे समाधान झाल्यानंतरच काम करा - पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश शनिवारी होणार पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा; आमदार प्रशांत ठाकूर यांची शिष्टाई आली कामाला


                       
 पनवेल : दि १८ डिसेंबर (4K News) मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सर्वेक्षण, प्रकल्प बाधितांशी चर्चा आणि त्यांचे समाधान झाल्यावरच या प्रकल्पाचे काम सुरु करावे, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना आज (दि. १४ डिसेंबर ) नागपूर येथे दिले. 







      मुंबई ऊर्जा मार्ग या प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील वळवली, टेंभोडे, कोळवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन आणि त्या अनुषंगाने बैठकीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, ऊर्जा प्रकल्प अधिकारी निनाद पितळे, आर्किटेक अतुल म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, मारुती चिखळेकर, सचिन तांडेल, हेमराज म्हात्रे, विजय भोईर, विजय गडगे, राजेश भोईर, दीपक उलवेकर, भास्कर आगलावे, प्रमोद आगलावे, प्रशांत कडव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.






      पनवेल तालुक्यातील विविध गावांमधून मुंवई उर्जा प्रकल्पाची वाहीनी टाकण्यात येणार असल्याने नवी मुंबई आणि परिसरातील लोकांचा लोडशेडींगचा प्रश्न निकाली लागणार असला तरी पनवेल तालुक्यात वारंवार होणारे शासकीय प्रकल्पांसाठीचे भूसंपादनामुळे पनवेल परिसरातील शेतकरी भुमीहीन होत चाललेले आहेत. अशा वेळेला सर्व शेतकऱ्यांच्या परंपरागत असलेल्या शेत जमिनी त्यांच्याकडून हिसकावून घेतली जाणे अथवा या परिसरात निर्माण होणाऱ्या विकासांच्या संधीचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला जात आहे आणि असे वारंवार घडत आहे. यामुळे येणारा प्रत्येक प्रकल्प हा देशासाठी, राज्यासाठी महत्त्वाचा असेल पण त्यामुळे त्या शेतकऱ्यांना फायदा होतोच असे नाही आणि त्यामुळे सदर प्रकल्पाच्या टेंभोडे, वळवली, कोळवाडी आणि अन्य परिसरातील ग्रामस्थांच्या जमिनींमधून सदर प्रकल्प जात असताना जर ठाणे जिल्हयामध्ये या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवरून वाहीनी न नेता ती वन खात्याच्या जमिनीतून नेण्याचा प्रस्ताव झाला आहे. 








तर तशाच पद्धतीने रायगड जिल्हयातील पनवेल तालुक्यामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी मर्यादेपेक्षा खूप मोठयाप्रमाणात भूसंपादन झालेले आहे अशा ठिकाणी हा पर्याय पडताळून पाहिला जात नाही ? अशी व्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान याबाबतीत सुद्धा शेतकरी (जमिन मालक) हे चिंतीत आहे आणि यामुळे या संदर्भामध्ये यापूर्वी सदर शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. अशाच पद्धतीचे आंदोलन अलिकडच्या काळात या परिसरातील ग्रामस्थांनी केलेले आहे. म्हणुनच या प्रकल्पाच्या संदर्भात मुंबई उर्जाच्या मार्फत ठाणे जिल्हयामध्ये अवलंबलेला मार्ग आणि पनवेल तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार उदय सामंत यांच्याकडे केली होती. 
       यावेळी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित होण्यापासून वाचवता येत असतील तर तसे प्रयत्नही करावेत, असे निर्देश देतानाच या संदर्भात गरज पडल्यास केंद्रीय हवाई खाते तसेच वनखात्याशी स्वतः चर्चा करण्याची तयारीही नामदार उदय सामंत यांनी दर्शवली. या संदर्भातील तात्काळ सूचनेमुळे आणि या बैठकीच्या अनुषंगाने येत्या शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे व ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या सोबत या प्रकल्पासंदर्भात पाहणी करणार आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत येथील काम कार्यान्वित करून नये, असे निर्देश नामदार उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले असून या बैठकीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 







         
थोडे नवीन जरा जुने