पनवेल दि.०९डिसेंबर (4K News): अग्रगण्य हॉस्पिटलबाह्य शुश्रुषा कंपनी असलेल्या एचसीएएच या कंपनीने महाराष्ट्रातील पहिले ट्रांझिशन केअर केंद्र (टीसीसी) खारघर येथे सुरू करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून एचसीएएचचा पश्चिम भारतात प्रवेश झाला आहे.
नवी मुंबई आणि जवळपासच्या भागातील लोकांना विविध सेवा प्रदान करून दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील याची हमी देणे, हे टीसीसीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये दीर्घकालीन गहन शुश्रुषा, कुशल नर्सिंग, जेरियाट्रिक केअर आणि आंतररुग्ण पुनर्वसन यांचा समावेश आहे. टाळता येण्याजोगे अपंगत्व कमी करणे आणि एका जागी खिळलेल्या लोकांना हालचाल करण्यास सक्षम करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
संसर्ग विरहित अशा या नवी मुंबई केंद्राची क्षमता 40 रूग्णांची असून येथे डॉक्टर, कुशल परिचारिका आणि प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिक सदैव उपलब्ध असतील. या केंद्रात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीची गरज आहे किंवा स्ट्रोक, मणक्याचे दुखापत, ट्रॉमा, पार्किन्सन्स, अल्झायमर आणि इतर अशा आजारातून बरे होत आहेत अशा रुग्णांना सेवा दिली जाईल. यावेळी एचसीएएचचे संस्थापक आणि सीईओ विवेक श्रीवास्तव म्हणाले, "भारतात रिहॅब केअरची बाजारपेठ मोठी असून तिचे मूल्य अंदाजे 32 अब्ज डॉलर एवढे आहे, असे ताजे अहवाल आहेत. त्यामुळे रूग्णालयाच्या मर्यादेपलीकडे सेवा देणार्या ट्रांझिशन केअर केंद्रांच्या मागणीत वाढ झाली आहे.
एचसीएएच इंडिया संपूर्ण शुश्रुषा क्षेत्रात पसरलेले सर्वसमावेशक हेल्थकेअर वितरण मॉडेल आणून या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे”. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना एचसीएएच संपूर्ण देशात आणि इतरत्रही दर्जेदार शुश्रुषा आणण्याच्या उद्देशाने रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन अवलंबत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि उच्च प्रशिक्षित हेल्थकेअर व्यावसायिकांनी सज्ज असलेले हे नवी मुंबईतील नवीन केंद्र ग्राहकांच्या वेदनांचे निराकरण करण्यासाठी कार्य,"असे विवेक पुढे म्हणाले. याप्रसंगी बोलताना एचसीएएचचे सह-संस्थापक आणि सीओओ डॉ. गौरव ठुकराल म्हणाले, “टीसीसी नवी मुंबई हे या भागातील आपल्या प्रकारचे एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. त्याच्या रूपाने आम्ही नावीन्यता आणि सहानुभूती यांच्यासह आरोग्यसेवेला नवा अर्थ देणे चालू ठेवत आहोत. रुग्णांच्या जीवनाचा दर्जा वाढवणे आणि असामान्य शुश्रुषा पुरवणे यासाठी आमची कटिबद्धता कायम आहे. एचसीएएचच्या इतर केंद्रांप्रमाणे, या केंद्रामध्ये तंत्रज्ञानाने सुसज्ज वातावरण, अत्याधुनिक उपकरणे, एक बॅलन्स लॅब, एक स्पीच लॅब, एक ओक्युपेशनल थेरपी लॅब आणि टप्प्याटप्प्याने बरे होण्याचे पुनर्वसन कार्यक्रम असतील. फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल, रेस्पीरेटरी आणि स्पीच-स्वॉलो थेरपिस्ट, आहारतज्ञ आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांसारखे तज्ज्ञ पुनर्वसन व्यावसायिक रुग्णांना जलद बरे होण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतील.
अनेक शहरांमध्ये 325 पेक्षा जास्त बेड्स असलेल्या ट्रांझिशन केअर सेंटर्सची देशातील सर्वात मोठी शृंखला म्हणून या घडामोडीमुळे एचसीएएचची स्थिती मजबूत झाली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये, 2500 ट्रांझिशन बेडची क्षमता गाठण्याचे आणि तंत्रज्ञानाद्वारे आपल्या सेवांचा विस्तार करण्याचे एचसीएएचचे उद्दिष्ट आहे. किफायतशीरपणा आणि उत्कृष्टता कायम ठेवणे हे आपल्या कामकाजाचे वैशिष्ट्य म्हणून कायम ठेवत असतानाच रुग्णांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन बाळगणे, ही तिच्या विस्ताराची रणनीती आहे. एचसीएएच हे वृद्धांसाठी भारतातील सर्वात मोठा जेरियाट्रिक प्लॅटफॉर्म असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एंड-टू-एंड सीनियर केअर वर्टिकल विकसित करत आहे. या भागात अशा प्रकारच्या सेवांची वाढती गरज भासत असतानाच हे केंद्र सुरू होत आहे, हे व
Tags
पनवेल