आदिवासी, ठाकूर वाडीतील ९७ कुटूंबांचे पातळगंगा एमआयडीसी जागेमध्ये होणार स्थलांतर; आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल (प्रतिनिधी) पिढ्या न पिढ्या लक्षात राहील असे कार्य आज संपन्न होत असून या सर्व कामाचे श्रेय हे आमदार महेश बालदी यांचे असल्याचे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी माडभुवन दरडग्रस्त आदिवासी ठाकूर वाडीतील कुटूंबीयांच्या जागा हस्तांतरण कार्यक्रमावेळी केले. आपटा ग्रुप ग्रामपंचायतीमधील माडभूवन दरडग्रस्त आदिवासी, ठाकूर वाडीतील ९७ कुटूंबांचे पातळगंगा
एमआयडीसी जागेमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आज (शनिवार, दि. ०९) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात जागा हस्तांतरणचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महेश बालदी यांनी एकही आदीवासी बांधव बिना घराचा राहता कामा नये असे प्रतीपादन करुन येत्या पावसाळ्याच्या आत तुमच्या घरांचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास व्यक्त केला.
आपटा ग्रामपंचायत अंतर्गत माड भुवन आदिवासी वाडी लगत असलेल्या डोंगराला गेल्या पावसाळ्यात मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. इरशालवाडीची पुनरावृत्ती माडभुवनवाडीत होऊ नये याची गांभीर्याने दखल घेत आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अतिवृष्टीच्या काळात या सर्व ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते.
या दरडीचा धोका लक्षात घेऊन भविष्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी या वाडीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून योग्य पुनर्वसन केले पाहिजे अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी शासन आणि प्रशासनाकडे केली. वाडीचे ग्रामस्थ आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्या सहमतीने पाताळगंगा एमआयडीसीमध्ये सारसई बागेची वाडी जवळ पुनर्वर्सणासाठी जागा उपलब्ध असल्याचे मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनात आणून दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदरच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊन माडभुवनच्या ९७ कुटुंबांना ३०० गुंठे जागा संपूर्ण पुनर्वसनासाठी एमआयडीसीने शनिवारी महसूल विभागाला हस्तांतरण केली. हा जागा हस्तांतरण कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे संपन्न झाला. या जागा हस्तांतरण कार्यक्रमालाआमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, प्रांत अधिकारी राहुल मुंडके, एमआयडीसीचे प्रादेशीक अधिकारी डॉक्टर संतोष थिटे, तहसीलदार विजय पाटील, भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रविण मोरे,
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच विद्याधर मोकल, मंगेश वाकडीकर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, राजू पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रफुल पाटील, माजी प्रभारी सरपंच विद्याधर जोशी, माजी सरपंच शनिवार उघडा, पनवेल तालुका युवामोर्चा सदस्य दिनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रत्नकर घरत, ज्ञानेश्वर भोईर, उमेश पाटील, ज्ञानेश्वर भोईर, राजेंद्र पाटील, दिनेश पाटील, केळवणे पंचायत समिती विभागीय युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, असद पिटू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी आणि एमआयडीसी प्रशासन तसेच महसूल विभागाचे आभार व्यक्त केले. तर आमदार महेश बालदी यांनी आता आपल्या वाडीला एमआयडीसी कडून जागा उपलब्ध झाली आहे लवकरच येत्या पावसाळ्यापूर्वी या जागेत घरकुल आणि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल तुम्ही काळजी करू नका असा शब्द ग्रामस्थांना दिला.
Tags
पनवेल