पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची सर्वसाधारण बैठक; मंचातील समाजसेवकांचा सत्कार


पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची सर्वसाधारण बैठक; मंचातील समाजसेवकांचा सत्कार 

पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील अग्रगण्य व शासन नोंदणीकृत असलेल्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची सर्वसाधारण बैठक मंगळवारी (दि. २३) येथे पार पडली. मंचचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार अविनाश कोळी व सल्लागार संजय सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, कार्यकारिणी सदस्य प्रवीण मोहोकर, राजेंद्र पाटील, राजू गाडे, भरतकुमार कांबळे व इतर सदस्य उपस्थित होते.  सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य केल्याबद्दल पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्यावतीने मंचाचे सल्लागार संजय सोनावणे यांचा गुणगौरव करण्यात आला त्याबद्दल त्यांचे तसेच अयोध्यात कारसेवक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडलेले मंचाचे सल्लागार अविनाश कोळी व सदस्य दीपक घोसाळकर यांचा मंचाच्या वतीने सत्कार तसेच अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने