रिपब्लिकन चळवळीचे नेते महेश साळुंखे घेणार आगामी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक


रिपब्लिकन चळवळीचे नेते महेश साळुंखे घेणार आगामी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक
पनवेल दि.२५(संजय कदम): रायगड जिल्ह्यातील रिपब्लिकन चळवळीचे नेते महेश साळुंखे यांनी येत्या रविवारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आयोजित केली आहे.
            आगामी लोकसभेच्या निवडणुकांविषयी चर्चा करण्याकरता सर्व कार्यकर्त्यांबरोबर ही बैठक आयोजित केलेली आहे .महेश साळुंखे आणि त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांना मागील सर्व निवडणुकांमध्ये महायुतीने त्याच बरोबर महाविकास आघाडीने वापरून घेतलेलं आहे .त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना कोणत्याही संस्थेवर संधी दिलेली नाही‌ त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये ज्या ठेकेदारी पद्धतीवर नोकर भरती होत असतात त्या नोकर भरतीमध्ये सुद्धा मागणी करूनही महेश साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही. महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या ज्या निवडणुकांविषयी चर्चा होतात या चर्चांमध्ये सुद्धा महेश साळुंखे यांना विचारात घेतले जात नाही .त्यामुळे महेश साळुंखे यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे . यापुढे जर जो कोणी सन्मानाची वागणूक देईल त्यांच्या सोबतच काम करायचं अशा प्रकारचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे . त्याविषयी चर्चा करण्याकरता आणि पुढील निर्णय घेण्याकरिता महेश साळुंखे यांनीही बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये आगामी सर्व निवडणुकांविषयी कोणती दिशा ठरवायची आणि कोणती रणनीती आखायची याविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे


थोडे नवीन जरा जुने