तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील लॉटरी विजेत्या सदनिका धारकांना मिळणार शिवसेनेमुळे न्याय







पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील तळोजा येथील सेक्टर 34 आणि 36 येथील 2019 च्या लॉटरी सदनिकांसाठी सिडकोकडे सातत्याने खा.श्रीरंग बारणे व शिवसेना पनवेल, रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस या भागातील सदनिकाधारकांना न्याय मिळणार आहे.




पनवेल तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019 च्या लॉटरी विजेत्यांना सिडकोकडून कुठल्याही प्रकारे ताब्याबद्दल किंवा नुकसानभरपाईबद्दल कुठलीच प्रक्रिया करण्यात आली नाही. त्यांच्या या प्रलंबित मागणीबाबत शिवसेना पनवेल, रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व खासदर श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांशी भेटून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांचे या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पनवेल तळोजा येथील लाभार्थ्यांना घराचे ताबे वेळेत न मिळाल्याने त्या कालावधितील प्रत्येकी तीन ते चार रुपये लाख माफ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय सिडकोचे एम डी अनिल डिग्गीकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह खा.श्रीरंग बारणे व शिवसेनेचे त्यांनी आभार मानले आहेत.


थोडे नवीन जरा जुने