पनवेल दि.०७ (वार्ताहर): सुकापुर - पलिदेवद विभागात मालेवाडी येथील नागरिकांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषध वाटप बाबासाहेब लिगल पँथर (K.G.F.- कायदेशीर गनरक्षक फौज महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या मध्यमातुन आज माता रमाई जयंतीचे औचित्य लक्षात घेऊन कार्तिक्य पार्क सोसायटी च्या आवारात करण्यात आले,
बाबासाहेब लिगल पँथर (K.G.F. - कायदेशीर गनरक्षक फौज) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रफुल भोसले सर व ॲडव्होकेट नीलमताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पँथर संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकरत्यांनि मोठया उत्साहात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करुण मालेवाडी व आकुर्ली येथील जवळपास 25 रहिवासी सोसायटीतील नागरिकांना याचा लाभ दिला. या शिबिरात विविध वैद्यकीय सेवांचा विनामूल्य लाभ नागरिकांना देण्यात आला. मातोश्री हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. गणेश वाकचौरे व डॉ. सुप्रिया वाकचौरे यांनी या शिबिरास भेट देवून पँथर संघटनेच्या सर्व पदाधिकारयांना सुखद धक्का दिला. व उपस्थीत नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच रायगड़ चे जेष्ट रिपबलीकन नेते नरेन्द्र गायकवाड़ व आकुर्ली विभागातील डॉ. मोशिन अत्तर यांनी शिबिरास सदिच्छा भेट देवून कर्यकरत्यांचे मनोबल वाढविले. विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींनी दिवसभर शिबिरास भेटी दिल्या. हा उपक्रम राबविण्यसाठी सिमीरा डायग्नोस्टीक्स व मातोश्री हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. गणेश वाघचौरे, डॉ. आशा व डॉ. सरिता खताळ - पावणे यांची संपूर्ण टीमने सहकार्य केल्या बद्दल बाबासाहेब लिगल पँथर संघटने कडून त्यांचे आभार मानण्यात आले. बाबासाहेब लिगल पँथर , K.G.F कायदेशीर गणरक्षक फौज संघटनेत मोठ्या प्रमाणात प्राध्यापक, ॲडव्होकेट, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक, सी.ए. शिक्षक तसेच उच्च शिक्षित वर्ग सामिल झाला आहे.
कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सर्व स्थरातील गोरगरिब दिन दुबळे, मागासवर्गीय इतर मागास, व अदिवासी बांधव यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे काम संघटना करत आहे. योग्य कायदेशिर पध्दतीने संविधानीक मार्गाने कुठलीही फी न घेता त्यांच्या समस्या सोडवत आहे, त्याना योग्य ते मार्गदर्शन करत आहे. तमेच त्यांचे मनोवल वाढवित आहे. महिला, बालक, वृद्ध व सर्व घटकातील आर्थिक दृष्टया दुर्बल व गरीब जनतेला सामजिक, शैक्षणिक, न्याय, क्रीडा, कला, आरोग्य, पुनर्वसन, ग्राहक संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, अन्न आणि नागरिक पुरवठा, कृषी, सहकार , संरक्षण, सरकारी उपाययोजना, कौशल्य विकास आणि उद्योजकता या क्षेत्रात संघटनेचे काम करण्याचि उदिष्टे आहेत. पुढे ही असेच सामजिक उपक्रम आपण संघटनेच्या माध्यमातून पनवेल मध्ये घेत राहू व नागरिकांची सेवा करत राहू अशी माहिती संघटनेचे सचिव शशिकांत सातपुते यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना दिली.
Tags
पनवेल