पनवेल दि.०२(संजय कदम): गेली ४४ वर्षे फक्त पनवेल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात आणि परदेशात डॉ. सुहास हळदीपूरकर यांचा नेत्र सेवा देण्यासाठी दबदबा असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी पनवेल शहरातील उरण नाका येथे लक्ष्मी आय हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूटचा नवीन दालनात लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
या दालनामध्ये अत्याधुनिक अशी नेत्रसेवेतील तंत्रज्ञाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रस्क्रियेसाठी लागणारे रोबेटीक लेझर हे येथे उपलब्ध होणार आहे. तसेच डोळ्याच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, नंबर घालवणे, मोतीबिंदू, फेको तंत्रज्ञाचा विकास आदी गोष्टी येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी दिली आहे. याबद्दल पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, रुग्ण प्रथम आणि गुणवत्ता यामध्ये कधीच तडजोड केली नाही. आज जगातील सर्वात नवीनतम तंत्रज्ञान कंटूरा लेसिक भारतामध्ये फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे. ते सुद्धा लक्ष्मी आय इन्स्टिटयूट मध्ये उपलब्ध होणार आहे.तसेच गोर गरिबांसाठी धर्मदाय रुग्ण सेवा म्हणून लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना १९९९ मध्ये करून अंत्यंत माफक दरामध्ये गरीब व गरजूंसाठी नेत्र एवं उपलब्द करून दिली जाते. पनवेल आणि पाली येथे संपूर्ण रुग्णालय चालविले जाते. तसेच इतर ठिकाणी व्हिजन सेंटर्स द्वारा नेत्रसेवा दिली जाते.
लवकरच बदलापूर आणि नेरळ येथे शाखा विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगिलते. आतापर्यंत त्यांनी सव्वा लाखांहून अधिक डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्या आहेत. सध्या डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या सोबतीला त्यांची कन्या डॉ. तन्वी हळदीपूरकर आजी जावई डॉ. देवेंद्र वेंकटरमणी हे सुद्धा हा वारसा पुढे नेत आहेत व येत्या ४ फेब्रुवारीला फेस १ मध्ये अत्याधुनिक असे दालन रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.
Tags
पनवेल