स्कुल व्हॅन च्या धडकेने दोघांचा मृत्यू; एक जखमी
स्कुल व्हॅन च्या धडकेने दोघांचा मृत्यू; एक जखमी
पनवेल दि.०६ (वार्ताहर): दारू पिऊन स्कूल स्कूल व्हॅन चालवणाऱ्या वाहनचालकाने दिलेल्या धडकेत व्हॅन खाली चिरडून एका ९ वर्षिय मुलासह ५० वर्षिय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कामोठे वसाहतीमधील जुई कामोठे गावाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. या अपघातात १ व्यक्ती देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी कामोठे पोलीसांनी मद्यधुंद चालक ओमकार विलास चव्हाण याला अटक केली आहे.             आर्यन दत्ता साळवे (वय ९), मंगल बाळू रोकडे (वय ५०) असे मृत झालेल्या व्यक्तींची नाव आहेत. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात वाहन चालकावर कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल रोकडे तसेच आर्यन साळवे आणि त्याचे कुटूंब तसेच इतर कुटूंब हे कामोठे वसाहतीमधील जुई कामोठे गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील फुटपाथ तसेच मोकळ्या जागेत राहत होते. हे सगळे कुटूंब दिवसभर आपले काम करून घरी विसाव्यासाठी आले होते. मात्र हा दिवस काळरात्र घेऊन आला आहे असे त्यांना माहीत नव्हते. नेहमीच्या दिनचर्येनुसार साळवे, रोकडे कुटूंब जेवणल्यानंतर आपल्या राहत्या झोपड्याच्या बाहेर गप्पा मारत बसले होते. तर काहीजण हे रस्त्यावर फेरफटका मारत होते. याच वेळी दारू पिऊन बेबूंद अवस्थेमध्ये स्कूल व्हॅनचालक स्वतःच्या ताब्यात असलेली एमएच ४६ बीबी ३४१८ ही स्कूल व्हॅन घेऊन कामोठे वसाहतीकडे निघाला होता. तो चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही व्हॅन रस्ता सोडून रस्त्यावरून चालणाऱ्यांना जाऊन धडकली. यावेळी रत्यावरून चालणारा एक नऊ वर्षीय युवक आर्यन आणि पन्नास वर्षीय महिला मंगल तसेच अन्य एका महिलेला गाडीने जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की, आर्यन या गाडीच्या खाली आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली तर, मंगल ही गाडीच्या धडकेने लांब फेकली गेली. या मध्ये आर्यनचा जागेवरच मृत्यू झाला. मंगल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर नधिया साळवे ( वय २०) हा सुद्धा जखमी झाला आहे. ही घटना घडल्यानंतर जखमींना तत्काळ एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. मात्र आर्यनचा जागेवरच मृत्यू झाल्याचे घोषित केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तर मंगल ही उपचारादरम्यान मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोचून वाहनचालकला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे. या वाहन चालकांवर कलम ३०४ (अ) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रस्त्यावरील पोलदेखील वाकला जुई कामोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ झालेला या अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, अपघाताला जबाबदार असलेली स्कूल व्हॅन ही रस्त्यावरील पोलला जाऊन आढळली आणि हा पोल चक्क वाकला आहे, हा पोल रस्त्या शेजारी नसता तर वाहन अपघातात मृत पावलेल्याची संख्या अधिक असती, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने