खांदा वसाहती मधील पाणी पुरवठा होणार सुरळीत






परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश.

 खांदा वसाहती मधिल सेक्टर 9 परिसरातील नागरिकांना काही दिवसापासून कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या या समस्येचे निरंकारण व्हावे या हेतूने परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्या वर उतारा म्हणून ज्यादा व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय सिडको तर्फे घेण्यात आला असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष वाघमारे यांनी दिली आहे. 


खांदा वसाहती मधिल सेक्टर 9 परिसरात असलेल्या हरिदर्शन,उमया कृपा,गुरुस्मृती, वरद विनायक,गणेश अपार्टमेंट, श्री श्रध्दा आणि स्वागत या सात रहिवाशी संस्था मधिल नागरिकांना मागील काही दिवसा पासून कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पाण पुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. या बाबत सदर रहिवाशी संस्था मधिल नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्याशी सपंर्क साधला असता सामाजिक कार्यकर्ते वाघमारे यांनी या बाबत सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता







 नागरिकांना होणाऱ्या गैरसोईची माहिती देत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली. वाघमारे यांच्या मागणीची दखल घेत शुक्रवारी ( ता.16) सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करणाऱ्या रहिवाशी संस्था मधिल नागरिकांची भेट घेऊन काही दिवसातच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असून,लवकरच ज्यादा व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले आहे.


थोडे नवीन जरा जुने