उलवे शहरात STP Plant च्या अस्वछते मुळे वाढतात डेंगू मलेरिया चे रुग्ण नागरिकांत असंतोष. याला ठेकेदाराचा आणि सिडको चा बेजबाबदार कारभार आहे.






उलवे: दि : 9 फेब्रुवारी (4K News)सिडकोला आणि ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी मी चालोय, येताय ना. या TAG लाईनवर मोर्चा स्थानिक नागरिकांनी 8 फेब्रुवारी सकाळी ११ वाजता उलवे येथील HT Plant वर धडक मोर्चा आयोजित केला होता, यात प्लॉट परिसरातील असंख्य नागरिक आणि कामगार उपस्थित होते





मात्र सिडको चे अधिकारी यांना ही खबर लागताच त्यांनी या ठिकाणी धावती भेट घेतली, येथील प्रामुख्याने समस्या आहे कि येथील हा SEVAGE TREATMENT PLANT. च्या अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना आणि संपूर्ण शहरात दुर्गंधी, रोगराई पसरत आहे. यामुळे अनेक नागरिक दगावण्याची शक्यता आहे. याची जबाबदारी कोण घेणार? 




असे नागरिकांच्या वतीने प्रश्न विचारण्यात आले . तसेच या ठिकाणी काम करत असणार्या कामगारांच्या आणि स्वच्छतेच्या बाबत जे काही समस्या आहेत. त्यावर तातडीने उपाय योजना कराव्यात हि मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली .





या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पत्रकार बंधू आणि स्थानिक नागरिक यांनी चांगलाच जाब विचारला, व ठेकेदाराच्या बेजबाबदापणामुळे असे घडत आहे असे कामगार म्हणले व त्याला सिडको चे अधिकारी कानाडोळा करत आहेत 




या वेळेस, या ठिकाणी अनेक संघटनाचे पदाधिकारी आणि नागरिक एकत्रित आले होते, यामध्ये प्रामुख्याने NMGKS चे प्रमुख वैभव पाटील, शिवसेना शहर प्रमुख गौरव म्हात्रे व अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. या सिडकोच्या अधिकारी यांच्या भेटी नंतर पुढील कारवाई काय होते, 





तसेच स्थानिक नागरिकांना, तेथील कामगारांना नाहक त्रास होता काम नये, असे शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव म्हात्रे सज्जड शब्दात प्रतिक्रिया नोंदवली, तसेच याच्या नंतर पुढील मोर्चेची दिशा लवकरच ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले..



थोडे नवीन जरा जुने