आशा की किरण फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दीनानिमित्त विविध कार्यक्रमाचे अयोजन*




पनवेल दि.12 (वार्ताहर): आशा की किरण फाउंडेशनच्यावतीने सुशिक्षित आणि अशिक्षित स्त्री वर्गाला प्रेरणा देण्याचा व त्यांचा आत्म-विश्वास वाढीस लागावा या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 



             “आशा की किरण फाऊंडेशन" नेहमीच गरीबू व गरजवंताना सहकार्य करण्याचा संकल्प वेळोवेळी करीत असते. त्याच अनुषंगाने आशा की किरण फाउंडेशनच्यावतीने वाजे येथील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ शुभांगी झेमसे, डॉ. गणेश वाघचौरे, श्रुती म्हात्रे, समाजसेवक मदन पाटील, डॉ. तराफ मौसीन, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचे स्वागत संस्थेच्यावतीने नूरजा कुरेशी व बशीरभाई कुरेशी यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत लावली होती.



थोडे नवीन जरा जुने