पनवेल दि.०८ (वार्ताहर): पनवेल तालुकफयातील बारापाडा गाव परिसरातून गेल्या काही दिवसांपासून मुक्या जनावरांची चोरी झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे येथील शेतकरी वर्ग व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
या परिसरात दुभती जनावरे रानात चरण्यासाठी मोकळी सोडली असता अज्ञात व्यक्ती या जनावरांना चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. मध्यंतरी पनवेल तालुकात पोलिसांच्या पथकाने अश्या प्रकारे जनावरांची चोरी करणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेत कारवाई केली होती. त्यानंतर गेली काही महिने ही जनावरे चोरीस जाण्याचे प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा एकदा अश्या प्रकारच्या चोरटयांनी डोके वर काढले असून आता पर्यंत १४ जनावरे चोरीस गेल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबतच्या तक्रारी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहेत.
Tags
पनवेल