पनवेल शहर पोलिसांच्या धडक कारवाईत रेल्वे स्टेशन परिसरात जबरी चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला घेतले ताब्यात





पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसापासून तेथून ये-जा करणार्‍या प्रवाशांना धमकावणे, जबरी चोरी, मारहाण करणे आदींच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांनी धडक मोहिम सुरू केली असून या अंतर्गत एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे



पनवेल शहर पो ठाणे हद्दीत रेल्वे स्टेशन परिसरात जेवण झाल्यानंतर फिरत असताना फिर्यादी यांचा मोबाईल फोन, वॉलेट अज्ञात व्यक्तीने जबरीने चोरी केल्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोे.नि.गुन्हे अंजुम बागवान, पो.उप.नि. अभय शिंदे, पो.हवा अविनाश गंथडे, यशवंत झाजम, सूर्यकांत कुडावकर, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पो.ना.प्रवीण मेथे आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी नामे सूरज उर्फ बाबू गोविंद वाघमारे (28) रा. नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन जवळ, पनवेल याने केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. यापूर्वी सुद्धा त्याने अशा प्रकारचे गुन्हे त्या परिसरात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 



थोडे नवीन जरा जुने