पनवेल दि.०२ (संजय कदम): पनवेल परिसरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भगवा ध्वज हाती घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी केले.
मनसे विद्यार्थी सेना माजी शहर प्रमुख राम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उप जिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, पनवेल महानगर संघटक शशिकांत डोंगरे, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेऊन त्यांनी प्रवेश केला. यावेळी पनवेल शहर संघटक राकेश टेमघरे, शाखा प्रमुख प्रदीप माखीचा आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल