पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण


       




         १८ व्या लोकसभेची निवडणूक जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी होणार आहे असे रोखठोक प्रतिपादन करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. ते म्हणाले की गेली दहा वर्षे मावळ लोकसभा मतदारसंघाचे दिल्लीतील लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान खासदारांविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येते. तर महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची मशाल यंदाच्या निवडणूक बाजी मारणार असे अभ्यासपूर्ण विश्लेषण केल्यानंतर त्यांनी मत प्रकट केले.