जागृती फाऊंडेशन च्या तळोजा विभागीय सरचिणीस पदी कुवर पाटील यांची नियुक्ती


पनवेल दिनांक २५ प्रतिनिधी
जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या  होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा  विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे

जागृती फाऊंडेशन च्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू ओप्रेशन ,मोफत चष्मे वाटप , आरोग्य शिबीर , वृक्ष लागवड , शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर ,रोजगार मेळावे ,महिला जनजागृती शिबीर , स्वावलंबन शिबीर , क्रीडा स्पर्धा ,करिअर मार्गदर्शन शिबीर या सह  विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याने संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन अनेक तरुण तरुणी ,महिलावर्ग कामगार वर्ग संस्थेमध्ये काम करण्यास इच्छुख असतात ,संस्थेमध्ये आलेल्या सदस्यांसाची कामाची आवड पाहून त्यांना योग्य वेळी योग्य पॅड देऊन जबाबदारी दिली जाते , कुवर पाटील सारख्या होतकरू  तरुणाची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे यावेळी कुवर पाटील यांना नियुक्ती पात्र देताना तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,उपाध्यक्ष संदेश पाटील उपस्थित होते .
थोडे नवीन जरा जुने