महाष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन अध्यक्ष पदी शंकर म्हात्रे तर सचिव पदी तुकाराम दुधे यांची निवड..


पनवेल (4K News)महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन ची नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत असोसिएशन च्या अध्यक्ष पदी शंकर म्हात्रे तर सचिव पदी तुकाराम दुधे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर मीडिया प्रमुख म्हणून राजेंद्र कोलकर यांची निवड करण्यात  आली आहे.

बांधकाम व्यवसाय करताना सिडको प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागाकडून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्रीयन  बिल्डर असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात  महाराष्ट्रीयन  बिल्डर असोसिएशन चे काम अतिशय चांगले सुरु असून नुकतीच या असोसिएशन ची बैठक  पार पडली.

 या बैठकीत मावळते अध्यक्ष आनंद पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर म्हात्रे यांना पदभार  दिला तर मावळते सचिव हितेश सावंत यांनी तुकाराम दुधे याना सचिव पदाचा पदभार  दिला यावेळी उपाध्यक्ष म्हणून के के म्हत्रे यांची निवड करण्यात आली.
 तर विविध पदांसह   खजिनदार सहखजिनदार पदी निवड करण्यात आली यावेळी बांधकाम व्यावसायिक किरण बगाड ,संतोष आंबवणे ,रवींद्र जोशी , विकास भामरे, लक्ष्मण साळुंके ,महेश माटे आदींसह सदस्य ,पदाधिकारी उपस्तिथ होते .
थोडे नवीन जरा जुने