कामोठे (4K News)शिकागो युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका (USA) यांच्याकडून कामोठे चे रहिवाशी जयकुमार शिवराज डिगोळे यांना मानद ची डॉक्टरेट ची पदवी देण्यात आली. नुकत्याच नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे हा पदवीदान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या सोहळ्यात त्यांना ही पदवी देण्यात आली.
ह्या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अध्यात्मिक गुरु आचार्य लोकेश मुनी, दिल्लीचे राज्यपालांचे ओएसडी पी के शर्मा, न्यायाधीश बी पी सिंग, मा राज्यसभा खासदार नरेश बन्सल व शिकागो ओपन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका (USA) चे स्टाफ अँड पदाधिकारी मेंबर उपस्थीत होते.
माननीय जयकुमार शिवराज डिगोळे यांनी जो वयाच्या 17 व्या वर्षापासून जो समाजसेवेचा जो विडा उचलला होता आणि तो समाजकार्य करत होते त्या समाजकार्याला खऱ्या अर्थाने आज त्याला न्याय मिळाला आणि त्याला शिकागो युनिव्हर्सिटी ऑफ यूएसए यांच्याकडून मानद अशी डॉक्टर ही पदवी समजसेवा ह्या विषया मध्ये देण्यात आली संपूर्ण भारतातून विविध विषयात अश्या २४ मानद पदवी देण्यात आल्या त्या मध्ये सामजसेवा ह्या विषयात डॉ जयकुमार शिवराज डिगोळे यांना हि पदवी प्रदान करण्यात आली.
अशी माहिती श्री जयकुमार डीगोळे यांनी 4K चॅनल ला दिली.
Tags
पनवेल