बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू,असा झाला एन्काउंटर


बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर
झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा रुग्णालयातून घेऊन जात अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या घटनेत पोलीस देखील जखमी झाले आहेत.
गोळीबारानंतर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षय शिंदेला नेण्यात आले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याने, पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या गाडीतच गोळीबार केला," असे पोलिसांनी सांगितले.
"या चकमकीत पोलिसही जखमी झाले होते, पोलिसांनी
प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याला
उपचारांसाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं," असंही पोलिसांनी सांगितले.
*असा झाला एन्काऊंटर -*
ठाणे क्राइम बॅचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन जात होते. यावेळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
थोडे नवीन जरा जुने