ॲक्टिव सिटिझन काऊन्सिल आणि कामोठे सेक्टर 34 येथील सोसायटी तर्फे साजरी झाली दिवाळी.




कामोठे (4K News) दिवाळी निमित्त सेक्टर ३४ येथे ॲक्टिव सिटिझन काऊन्सिल व सेक्टर ३४ येथिल सोसायटी यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या शहरातील सर्व  स्वच्छता दूत, आरोग्य कर्मचारी, धूर फवारणी व ईतर सर्व कर्मचारी बांधव यांना दिवाळी भेट वस्तू तसेच दिवाळी फराळ , मिठाई वाटप करण्यात आले. 



यातून देश हिताचा, सर्वांच्या एकीचा,बांधिलकी जपण्याचा  संदेश यातून दिला. शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी, महानगरपालिका व लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी तत्पर व सज्ज आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त केला असे पनवेल महानगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री. विकास घरत यांनी सांगितले. 



यावेळी महानगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री. विकास घरत माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, डॉक्टर सखाराम गारळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री .राहुल बुधे श्री.आदित्य भगत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.नाना मगदूम कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र पाधी विजय सरगर सुशांत काटकर भूषण यादव चंद्रकांत यादव चंद्रकांत खोसे व सर्व सोसायटींच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने