पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद


पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या 'दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या' अर्थात सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. 

       बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच खारघर यांच्यावतीने खारघर मधील स्वप्नपूर्ती सोसायटी येथे 'दीपसंध्या' कार्यक्रम होणार आहे. सूर नवा ध्यास नवा फेम प्रणय पवार, दिपाली देसाई, अभिषेक नलावडे या प्रसिद्ध गायकांचे गायन सादरीकरण होणार आहे

. शुक्रवार दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५. ३० वाजता पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे आनंद गंधर्व पं. आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांचे सुमधुर गायन असलेले 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रसिद्ध सूत्रसंचालिका दीप्ती भागवत या सूत्रसंचालन करणार आहेत. 
तसेच अल्पावधीतच आपल्या गायकीचा ठसा जनमानसाच्या मनावर उमटवणाऱ्या दिल्ली येथील सुप्रसिद्ध गायिका मैथली ठाकूर यांचे सुश्राव्य गायन श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच खारघरच्यावतीने शनिवार दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खारघर सेक्टर १२ मधील गावदेवी मैदान येथे तर रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कळंबोली मधील रोडपाली बस डेपो येथे शिवशंभो सामाजिक विकास मंडळ कळंबोलीद्वारा 'दिवाळी संध्या' या सांस्कृतिक कार्यक्रमातून होणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्याकडून करण्यात आले आहे. 




थोडे नवीन जरा जुने