काँग्रेसला मोठा धक्का !



काँग्रेसने पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माजी महापौर आणि काँग्रेस नेत्या कमलताई व्यवहारे नाराज झाल्या आहेत. त्यांनी पक्षात 40 वर्षांपासून काम केले असून आता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

 यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले असून धंगेकर यांच्यासमोर आव्हान वाढले आहे. दरम्यान, भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे कसबा पेठची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.


थोडे नवीन जरा जुने