यादी जाहीर होताच भाजपात पहिली बंडखोरी



भाजपच्या पहिल्या यादीत ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळाली, मात्र बेलापूरमधून संदीप नाईक यांना तिकीट न दिल्याने ते नाराज आहेत.

 विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा तिकीट मिळालं आहे, ज्यामुळे संदीप नाईक यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पक्षात राहून किंवा अपक्ष निवडणूक लढवायची हे ठरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
थोडे नवीन जरा जुने