शिवसेनेचा ढाण्या वाघ आजारी असतानाही उतरला निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात


पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले असलेले शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांचे नुकतेच ऑपरेशन झाले असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार लिना गरड यांच्या प्रचारार्थ जखमेचे टाके ओले असतानाही ते पनवेल शहरातील आद्य क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित प्रचार बैठकीत उपस्थित राहून त्यांनी भाषण ठोकले व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणले.
महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व पक्ष एकत्रित गेल्या अनेक वर्षापासून काम करीत होतो, निवडणुका लढवित होतो व विजय संपादन करत होतो. परंतु शेकापक्षाने ऐनवेळी गद्दारी करून कोणालाही विश्‍वासात न घेता आपल्या पक्षाचे 4 उमेदवार घोषित केले. यातूनच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली. या मतदार संघात शिवसेनेने गद्दारी केलेली नसून ती शेकापक्षाने केली आहे. परंतु आम्ही गप्प बसणार नाही, मशाल पनवेल विधानसभेत पेटवणारच व कोणत्याही परिस्थितीत लिना गरड यांना विजयी करणार. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. यासाठी 2 दोन दिवसात गावागावात जावून मी मशालीचा प्रचार करून लिना गरड यांना विजयी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने