जय गोपीनाथ प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील पाठिंबा पत्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
 
      पनवेल परिसरातील सर्व वंजारी समाज बांधव व जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कर्तृत्ववान व कर्तबगार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, मार्गदर्शक बबन बारगजे, सचिव हनुमंत विघ्ने, विठ्ठल घोळवे, मोहन केदार, प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर, रायगड जिल्हाध्यक्ष तुकाराम केदार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खरमाटे, स्वप्नील राख, लक्ष्मण जायभाये, दिलीप गर्जे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने