आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्व समाज बांधवाना न्याय - माजी सभागृहनेते परेश ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आहे.  त्यामुळे आता सर्वांनी एकत्रित येऊन होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. 
 
         पनवेल कोळीवाड्यातील कोळेश्वर विद्यामंदिर शाळेसमोर त्यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, उद्योजक इकबाल काझी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकीद काझी, पापा पटेल, भाजप शहर उपाध्यक्ष अमित ओझे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमन अख्तर, प्रितम म्हात्रे, जवाद काझी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

         आमदार प्रशांत ठाकूर हे सामाजिक कार्याला महत्व देतात. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ते सहकार्य करतात. सामाजिक कार्यात कधीही राजकारण आणत नाहीत. प्रत्येक समाजातील लोकांच्या सुख दुःखात ते असतात. पनवेलच्या विकासासाठी त्यांनी नेहमी सकारात्मक ऊर्जेने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्व समाजातील आणि तळागाळातील लोकं पाठीशी आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून देत पनवेलच्या विकासाला मत देणार असून यापुढेही अधिक जोमाने काम करण्यासाठी तुमची ताकद प्रशांतदादांना द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

थोडे नवीन जरा जुने