बालाजी सिम्फनी मधील सर्व सोसायटींचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठींबा

पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील आकुर्ली-सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींनी भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला बिनशर्त पाठींबा आज जाहीर केला. 
       यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, सोसायटीचे पदाधिकारी व प्रतिनिधी, भाजपचे तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, तालुका चिटणीस  यतिन पाटील, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा नेते राजेश पाटील, दीवेश भगत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
         कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पनवेलच्या विकासावर भर दिला. त्याचबरोबरीने सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी समाजकार्यातही स्वतःला झोकून दिले. त्यामुळे पुन्हा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हेच विजयी झाले पाहिजेत, यासाठी त्यांना विविध संस्था, संघटनेचा पाठिंबा मिळत असून आज बालाजी सिम्फनी मधील सर्व सोसायटींनी जाहीर पाठिंबा देत आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्पही केला.
 

थोडे नवीन जरा जुने