शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभिवादन

शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर परिसरातील गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. त्या अनुषंगाने आज मोठ्या थाटामाटात गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली.  
लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास  दिवस आहे.  जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, गुरुद्वारात अभिवादन केले तसेच शीख बांधवाना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस नितीन पाटील, ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी,  बबन मुकादम,  अमर पाटील, राजेंद्र शर्मा, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, आदी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने