पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा-188 निवडणूक 2024 महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचाराची कळंबोली शहरातील सुरुवात काळभैरव मंदिर कळंबोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली तसेच कळंबोली शहरात प्रचार पत्रक वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख आत्माराम गावंड, शहर प्रमुख सुर्यकांत म्हासकर, युवासेना सहसचिव अवचित राउत, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, तालुका संघटिका सौ. अनिता डांगरकर, शहर संघटिका सौ. ज्योती मोहिते, शहर संपर्क संघटिका सौ. रत्नमाला शिंदे, आजी, माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.