पनवेल विधानसभा १८८ निवडणूक २०२४ महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचाराची सुरुवात

आज पनवेल विधानसभा १८८ निवडणूक २०२४ महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचाराची सुरुवात पनवेल ग्रामीण येथील नितळस गावात शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, युवासेना सहसचिव अवचित राउत, सरपंच सौ. निकिता संदीप पाटील, मधू पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ..सुजाता कदम, महानगर संघटिका सौ. अनिता डांगरकर , आजी, माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने