आमदार प्रशांत ठाकूर यांच्या चौथ्या विजयामध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल ... सय्यद अकबर



पनवेल / प्रतिनिधी 
     पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे सलग चौथ्या विजयासाठी तयार झालेले आहेत. समाजातील प्रत्येक स्तरांतून त्यांना पाठिंबा प्राप्त होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजपला आपलेसे केले नाही. यापासून बोध घेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी मॅन टू मॅन प्रचारावर भर दिला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सलग चौथ्या विजयामध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास त्यांनी प्रकट केला.
       सय्यद अकबर यांनी नुकताच नवनाथ नगर वसाहत आणि आदई गावातील मुसलमान वसाहतीत घरोघरी जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार केला. मुसलमान बांधवांच्याकडून आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. ते पुढे म्हणाले की प्रत्येक मुसलमान बांधवाला जाऊन मी हे सांगत आहे की भाजपा हा आपला मित्र आहे. धर्मांधतेची झालर लावून आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आपण मात्र सबका साथ सबका विकास! हा मूलमंत्र जपणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुती चे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. 
      सय्यद अकबर पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या आदेशाने माझ्यासारखे तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मुसलमान बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झालेले आहेत. हा प्रचार करत असताना भारतीय जनता पार्टीने मुसलमान बांधवांसाठी केलेलं कार्य आम्ही त्यांना सांगत आहोत. मग त्यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास वित्त महामंडळाच्या माध्यमातून अमलात आणलेल्या योजना असतील. अल्पसंख्यांक बांधवांसाठी असणारी मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना असेल.
 पंतप्रधान विरासत का संवर्धन म्हणजेच पी एम विकास या योजनेअंतर्गत मुसलमान बांधवांना मिळणारे लाभ असतील, पी एम जनविकास, पी एम आवास, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, पीएम मुद्रा योजना, आयुष्मान भारत अंतर्गत मुसलमान बांधवांना मिळणाऱ्या वैद्यकीय उपचार सहाय्य योजना आणि अगदी अलीकडे थेट लाभार्थ्यांना लाभ देणारी लाडकी बहिण योजना. हे सारे आम्ही मुसलमान बांधवांना समजावून सांगत आहोत. 
       या व्यतिरिक्त मी स्वतः ई डब्ल्यू एस योजनेचे अंतर्गत ७० मुसलमान बांधवांना लाभ मिळवून दिलेला आहे. यापैकी वीस मुसलमान मुले पोलीस भरतीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना मी जेव्हा जेव्हा मुसलमान बांधवांची आर्थिक अडचणीची प्रकरणे घेऊन जातो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी सढळ हाताने मदत केलेली आहे. गरजवंत मुसलमान रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यास रामशेठ ठाकूर स्वतः त्याला भरभरून अर्थसहाय्य करतात.आमदार प्रशांत ठाकूर हे मुसलमान बांधवांची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असतात. हजारो मुसलमान मुलांना त्यांनी शाळा प्रवेश, ही माफी यासाठी सहकार्य केलेले आहे. त्यांच्यामुळेच पनवेलमध्ये अल्पसंख्यांक मुलींकरता वस्तीगृह उभे आहे. कोकणातील अनेक होतकरू मुलींना या वस्तीगृहाचा लाभ होत आहे. आम्ही करत असलेले हे सगळे कार्य मी माझ्या प्रत्येक मुसलमान मतदाराला सांगत आहे. खाडी किनारी राहणाऱ्या मुसलमान बांधवांच्या घरामध्ये पावसाळ्यात भरतीचे पाणी शिरायचे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खाडीकिनारी भिंत बांधण्याचे काम काही दिवसात होईल.आमदार प्रशांत ठाकूर यांचे हे कार्य घराघरात घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
          नुकताच पिंपरी चिंचवड येथे राहणारी निष्पाप मुलगी समरिन नेवरेकार  व तिची पाच आणि दोन वर्षाची निरागस मुले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला कडक शासन करण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. अल्पसंख्यांक आयोग आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून नराधमांना फाशीची शिक्षा आणि तिच्या कुटुंबीयांना समाधानकारक सांत्वन व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा मी एकमेव मुसलमान समाजातील नेता आहे. हे देखील मी प्रत्येक मतदाराला सांगत आहे.
     मीरा-भाईंदर महानगरपालिके अंतर्गत उत्तन येथे समुद्रकिनारी असणाऱ्या शेकडो वर्ष पुरातन हजरत सय्यद बाले पीर शाह बाबा दर्गा निष्कासित करण्यासंदर्भात काही समाजविघातक विकृतींनी षडयंत्र रचले होते. मुसलमान बांधवांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या रमजान महिन्यामध्ये दर्गा निष्काशीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे समाजविरोधी शक्तींचे षडयंत्र होते. हे प्रकरण समजताच मी तातडीने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मूळ दस्तावेज आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या माध्यमातून सदर दर्गा हा पुरातन आणि श्रद्धेचे स्थान असल्याचे त्यांना पटवून दिले. माझ्यामुळेच मुसलमान बांधवांच्या पवित्र धार्मिक जागेच्या निष्कासनाची कारवाई थांबलेली आहे.अशा कार्यातून भारतीय जनता पार्टी ही सदैव मुसलमान बांधवांच्या पाठीशी उभी असल्याचे दाखले मी जागोजागी देत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मते मिळणार यात जराही दुमत नाही. 
       बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मुसलमान कुटुंबांच्यामध्ये मी धार्मिक शिक्षणाच्या जोडीने आधुनिक शिक्षण घेण्यासाठी आग्रही राहत आहे. ज्या पद्धतीने आमच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे ते पाहता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सलग चौथ्या विजयामध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल. या प्रचार दौऱ्यामध्ये सय्यद अकबर यांच्या समवेत अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी साबीर शेख व नविद पटेल हे देखील अथक परिश्रम घेत आहेत. 

   पनवेल नवनाथ नगर वसाहतीमध्ये जरीना शेख, असमा शेख, नाहिद शेख,हिना शेख,आर्शिन शेख, कवसर शेख, फातिमा शेख, फातिमा अन्सारी या हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. तर आजही येथे नेवाळी आदईचे शक्तिकेंद्र प्रमुख निलेश बाळाराम पाटील, कैलास पाटील, जरारअली खान,अमीर शेख सहभागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने