महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लिना गरड यांचा पनवेल, नवीन पनवेलमधून मोटार सायकल रॅलीद्वारे प्रचार उत्स्फूर्त प्रतिसाद


पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः महाविकास आघाडीच्या उमेदवार लिना गरड यांनी पनवेल, नवीन पनवेल परिसरातून काढलेल्या मोटार सायकल रॅलीद्वारे प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोणत्याही परिस्थितीत यावेळी आम्ही मशाली समोरचे बटण दाबून लिना गरड यांना विजयी करू, असे आश्‍वासनच पनवेलवासियांनी दिले आहे.
पनवेल शहर तसेच नवीन पनवेल परिसरात उमेदवार लिना गरड यांच्या साथीने मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना व इतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह सामाजिक संघटना, संस्था या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महिलांची उपस्थिती  लक्षणीय होती. ठिकठिकाणी उमेदवार लिना गरड यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. 
नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख पुष्पहार घालून विजयाची नांदीच देण्यात आली. अनेक संस्थेच्या नागरिकांनी यावेळी लिना गरड यांची भेट घेवून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे व मशाली समोरील बटण दाबण्याचे आश्‍वासन दिले. या रॅलीची विरोधकांनी धडकी घेतली आहे.
थोडे नवीन जरा जुने