शिवसेनाप्रमुखांना नृत्याविष्काराचे अभिवादन!
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त
हिंदुहृदय सम्राटांच्या प्रतिमेसमोर शिवसेनेकांसह कळंबोलीकर नतमस्तक
जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल/ प्रतिनिधी:- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कळंबोली येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने लहान मुलांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालकलाकारांनी नृत्याविष्कार सादर करत शिवसेनाप्रमुखांना एक प्रकारे अभिवादन केले. यानिमित्ताने शिवसैनिक त्याचबरोबर कळंबोलीकर बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कळंबोली येथील बाळासाहेबांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी,
रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, शंकर विरकर, महेश गोडसे, संजय शेडगे, रणजीत फडतरे, शरद कदम,निलेश दिसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत पारंपारिक त्याचबरोबर मराठमोळ्या गाण्यांवर स्पर्धकांनी नृत्य केले. त्याचबरोबर वेस्टन सॉंग वरही चिमुकले थिरकले महाराष्ट्राची लोकधारा असणाऱ्या लावणी वर अनेक बालकलाकारांनी नृत्य करीत उपस्थितांना जिंकून घेतले. अत्यंत लहान मुला मुलींनीही नृत्याविष्कार करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तत्पूर्वी संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Tags
पनवेल