सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन





पनवेल दि. ०३ (संजय कदम): सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून पनवेल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन येत्या रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत पूज्य सिंधी पंचायत हॉल, विश्राळी नाका येथे करण्यात आले आहे. 



रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट, रुधिरसेतू व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या वतीने या रक्तदान शबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पनवेलकरांनी स्वेच्छेने रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवावेत असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत.




थोडे नवीन जरा जुने