माजी शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांना मातृशोक
पनवेल दि.१३ (वार्ताहर) : म्हसळा माजी शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांच्या मातोश्री सुशीला शिर्के यांचे वयाच्या 95 वर्षी नुकतेच मौजे शिर्के ताम्हाणे, म्हसळा येथील राहत्या घरी सांयकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मोठा मुलगा रायगड जिल्हा प. बांधकाम इंजिनिअर संघटनेचे माजी अध्यक्ष सदानंद शिर्के, शिवसेना शाखाप्रमुख पनवेल चंद्रकांत शिर्के, माजी म्हसळा तालुकाप्रमुख नंदू शिर्के, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.थोडे नवीन जरा जुने