ब्रेन ट्यूमरमुळे दृष्टीदोष आणि डोकेदुखी असलेल्या ५० वर्षीय येमेनी रुग्णावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार
*ब्रेन ट्यूमरमुळे दृष्टीदोष आणि डोकेदुखी असलेल्या ५० वर्षीय येमेनी रुग्णावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार*
पनवेल दि.०८(वार्ताहर): ब्रेन ट्यूमरचे निदान झालेल्या 50 वर्षीय येमेनी व्यक्तीवर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्स येथे दुर्मिळ अशी ट्रान्सनसाल एंडोस्कोपिक ट्यूमर एक्सिजन सर्जरी केली. या ट्युमरमुळे रुग्णाच्या ऑप्टिक नर्व्हवर दाब येत होता आणि त्यामुळे डोकेदुखी, नजर कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू लागल्या होत्या. न्यूरोसर्जिकल टीमचे डॉ हरीश आर नाईक, न्यूरो सर्जन (मेंदू आणि मणका), डॉ राजेंद्र वाघेला, सल्लागार ईएनटी सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.    येमेन येथे राहणारे इब्राहिम यांना दृष्टीदोषामुळे त्यांच्या सामान्य दिनचर्येत अडचणी जाणवू लागल्या होत्या. दुर्दैवाने रुग्णाला गंभीर डोकेदुखीचा त्रास सतावू लागला ज्यामुळे त्याच्या आरोग्यासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्या. रुग्णाने येमेनमधील विविध वैद्यकांचा सल्ला घेतला ज्यांनी त्याला काही काळापुरता आराम देणारी औषधे लिहून दिली. मात्र रूग्णाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली होती आणि त्यामुळे तो आपली दैनंदिन कामे सहजतेने करू शकत नव्हता. यापूर्वी रुग्णावर डॉ ब्रजेश कुंवर(संचालक- कार्डीयाक सायन्स) यांनी अँजिओप्लास्टी केली होती आणि रुग्न अँटीप्लेटलेटवर होता. दिवसेंदिवस रुग्णाची प्रकृती ढासळत असल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांनी खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्सकडे धाव घेतली. डॉ हरीश आर नाईक, सल्लागार न्यूरोसर्जन (मेंदू आणि मणका), मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई सांगतात की १२ मे रोजी आपत्कालीन स्थितीत रुग्ण दाखल झाला होता आणि त्याला तीव्र डोकेदुखी आणि नजर कमी झाली होती.  मेंदूच्या एमआरआयने ऑप्टिक नर्व्हवर दाब येत होता अंदाजे 3x4 सेंटीमीटरचा पिट्यूटरी ग्रंथी ट्यूमरचे निदान झाले. हा ट्यूमर दुर्मिळ असून प्रत्येकी 1 लाख लोकसंख्येमागे 10 व्यक्तीमध्ये आढळून येतो. ट्यूमर काढण्यासाठी त्याच्यावर ट्रान्सनसाल एन्डोस्कोपिक ट्यूमर एक्सिजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या कुटुंबाला शस्त्रक्रियेपूर्वी फायदे आणि जोखमींबाबत समुपदेशन करण्यात आले आणि शस्त्रक्रियेच्या ७ दिवस आधीच अँटीप्लेटलेट बंद करण्यात आले. डॉ. नाईक पुढे सांगतात की, पिट्यूटरी ट्यूमरमुळे संप्रेरकासंबंधी समस्या आणि दृष्टी कमकुवत होऊ शकते. पिट्यूटरी ग्रंथी आणि कवटीच्या तळापासून गाठी काढून टाकण्यासाठी नाकातून एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया केली जाते. या मिनिमली इन्व्हेसिव शस्त्रक्रियेमध्ये, शल्यचिकित्सक एक लहान एंडोस्कोप कॅमेरा वापरुन नाकपुड्यांमधून लांब उपकरणाच्या मदतीने ट्यूमर काढून टाकण्याचे काम करतात. यामध्ये जास्त चिरफाड न करता एक लहान चीर दिली जाते. डोक्यावर कोणतीही जखम न होता ही गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुमारे 3 तास चालली आणि 20 मे रोजी रुग्णाला घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृती चांगली सुधारणा झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याला नजर कमी होणे आणि डोकेदुखी यांसारख्या लक्षणांपासून तात्काळ आराम मिळाला. त्याच्यावर योग्य वेळी उपचार झाले नसते तर दृष्टी गमावणे, पिट्युटरी ग्रंथीचे नुकसान, चक्कर येणे अशी भविष्यातील गुंतागुत वाढण्याची शक्यता होती. तंत्रज्ञानातील प्रगती, आधुनिक उपचार पध्दती आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळे आम्हाला उच्च-जोखीम असलेल्या ट्यूमर प्रकरणांचे अचूकतेने व्यवस्थापन करणे शक्य झाल्याचेही डॉ नाईक यांनी स्पष्ट केले. डॉ जयेंद्र यादव सल्लागार, न्यूरोलॉजिस्ट म्हणाले की या पिट्यूटरी ग्रंथी ट्यूमरचा लवकरात लवकर शोध घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तसे न केल्यास ट्युमरच्या आकारात वाढ होणे, दृष्टीवर विपरीत परिणाम तसेच हार्मोनल असंतुलनाचा सामना करावा लागू शकतो. मला असह्य डोकेदुखी आणि दृष्टी कमकुवत झाली होती. ज्यामुळे मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. मी अनेक औषधे आणि घरगुती उपाय करून पाहिले पण सारे काही व्यर्थ ठरले. ट्यूमरच्या निदानानंतर माझे मी घाबरुन गेलो होतो. खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो ज्यांनी या जीवघेण्या ट्यूमर पासून मुक्त केले. माझी डोकेदुखी आता नाहीशी झाली आहे आणि माझी दृष्टी देखील सुधारली आहे असे रुग्ण इब्राहिम यांनी सांगितले.
फोटो : मेडिकवर हॉस्पिटल


थोडे नवीन जरा जुने