तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज सेफ्टी अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात प्रतिबंधक मार्गदर्शन शिबीर संपन्न





पनवेल दि.१७ (संजय कदम) : तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज सेफ्टी अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये अपघात प्रतिबंधक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपघात प्रतिबंधाबद्दल जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमात तळोजा एमआयडीसीतील उद्योगांनी या मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 


या कार्यक्रमाला डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज सेफ्टी अँड हेल्थचे उपसंचालक अंकुश खराडे, केशव केंद्रे, अजित मोहिते, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी, सचिव बिनीत सालियन, सदस्य भावेश मोदी, महासचिव बिदुर भट्टाचार्जी, कार्यकारी सचिव सुनील पाधिहारी यांच्यासह तळोजा एमआयडीसीतील उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज सेफ्टी अँड हेल्थच्या अधिकाऱ्यांनी अपघात प्रतिबंधाची मूलभूत तत्त्वे, संभाव्य घटना, जवळच्या अपघातांची पुनरावृत्ती रोखणाऱ्या जलद कृती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीत अल्केम, शेरॉन बायो फार्मा, आयजीपीएल, एलएसआर ऑइल, नंदन पेट्रोकेम, स्मिथर्स ओएसिस, एस्के डायस्टफ, सांघी ऑर्गनायझेशन, टेक्नोव्हा, एसकेएम मेटल प्रोसेसर्स, केएसएच इंटरनॅशनल, क्वेस्ट परफॉर्मन्स, फियाबिला, वाल्व्ह टेक, रवी विस्टा डायस्टफ सारखे तळोजा एमआयडीसीमधील अनेक उद्योग तसेच प्रोसेस्ड फूड्स, चोकसी केमिकल्स, बन्सल आयर्न प्रोसेसर्स, दीपक फर्टिलायझर्स, ओवेन्स कॉर्निंग, तळोजा स्टील सर्व्हिस सेंटर, इंदू कॉर्पोरेशन, लासन्स इंडिया, मोडीकेम फार्मा इत्यादींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
थोडे नवीन जरा जुने