दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ चा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने साजरा


पनवेल दि.१७ (संजय कदम) : दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ चा वार्षिक स्नेहसंमेलन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली पब्लिक स्कूल नवी मुंबई व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष राहुल सिंग उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमाला संस्थेच्या खजिनदार नमिता प्रधान, कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. किरण दातार, राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बंठिया यांच्यासह शाळेचे प्राचार्य जे. मोहंती, वरिष्ठ माध्यमिक शाखेच्या उपाध्यक्षा सीमा रॉय, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्लोकाचे सादरीकरण आणि भावपूर्ण प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत' सादर केले. या सुरेल सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुमधुर संगीताच्या माध्यमातून शास्त्रीय गायनाची प्रतिभा दाखवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 'रवींद्र नृत्य' द्वारे रवींद्रनाथ टागोरांची कलात्मक बाजू सर्वांसमोर मांडत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर शाळा आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा शाळेचा वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यांनतर 'बी द चेंज' या आशयांतर्गत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सादर केली. राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
थोडे नवीन जरा जुने