पनवेल परिसरात आढळला बेवारस मृतदेह





पनवेल परिसरात आढळला बेवारस मृतदेह
पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल परिसरात एका ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पनवेल शहर पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 



           सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून तो रंगाने सावळा, उंची अंदाजे ५ फुट ४ इंच, डोक्याचे केस काळे व पांढरे बारीक असा त्याचा वर्णन आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्याशी संपर्क साधावा. 



थोडे नवीन जरा जुने