पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वावंजेगांव येथे मोहला कमेटी व शांतता कमिटी सदस्य यांची सध्याच्या राजकीय व धार्मिक परिस्थिती या विषयावर बैठक पार पडली. याबैठकीत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर यांनी सर्व सदस्यांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
या बैठकी दरम्यान सध्या सोशल मीडिया यावर चुकीच्या मेसेज प्रसारित होत आहेत. धार्मिक किंवा राजकीय मेसेज, आक्षेपार्ह फोटो, याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ बिट चौकी तसेच पोलीस ठाणे येथे संपर्क करून अवगत करावे. धार्मिक किंवा राजकीय, तेढ निर्माण करणारे मेसेज आल्यास ते पुढे फॉरवर्ड करू नये आणि ज्यांनी पाठवले असेल त्याला देखील समज द्यावी.
गावात किंवा रहिवासी परिसरात कोणी इसम महिला व लहान मुले, मुली यांना त्रास देत असल्यास त्याबाबत पोलीस ठाणे ते त्वरित माहिती द्यावी अश्या सूचना पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर यांनी उपस्थितांना दिल्या तसेच आगामी साजरे होणारे सण-उत्सव तसेच पुढील काळात होणाऱ्या सार्वजनिक निवडणुका या अनुषंगाने सर्वांनी सतर्क राण्यांचे आवाहन केले. यावेळी गोपनीय विभागाचे कुंवर व पंकज शिंदे यांच्यासह मोहल्ला कमिटी/ शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.
Tags
पनवेल