अल्पवयीन तरुणाचे अपनयन






अल्पवयीन तरुणाचे अपनयन*
पनवेल दि.०८ (वार्ताहर) : पनवेल शहरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणसाठी कायदेशिर रखवालीतुन फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



    
                    सदर तरुणाची उंची १६० सेमी असून त्याचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, दाढी बारीक डोक्याची केस बारीक कट केलेला, अंगात सफेद रंगाचा फुल बाहयांचा शर्ट त्यावर छातीजवळ काळा पटटा, काळया रंगाची फुल जिन्स पॅन्ट, पायात काळया रंगाची प्लास्टीकची स्लीपर असा त्याचा वर्णन आहे. 




तसेच त्याच्या उजव्या हाताचे मनगटाचे वर साईबाबाचा फोटो गोंदलेला आहे. सदर तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजरत्न खैरणार यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने