अक्षय भालेराव याच्या मारकस्यांना फाशीची शिक्षा द्या; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचे पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन





अक्षय भालेराव याच्या मारकस्यांना फाशीची शिक्षा द्या; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचे पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन*
पनवेल दि.०८ (संजय कदम) : नांदेड येथील बोंडार हवेली येथील मागासवर्गीय समाजाचा युवक अक्षय भालेराव याच्या मारेकऱ्यांना फाशीची सजा देण्यात यावी व त्यासाठी उज्वल निकम सारखा सरकारी वकील नेमण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



          नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथीला युवक अक्षय भालेराव याचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून सवर्ण समाजातील ७ ते ८ गावगुंडांनी मिळून लाठ्या, लोखंडी रॉड व चाकूने निर्घुणपणे खून केला. यामुळे दलित समाजा मध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. दलितांवर अन्याय करण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. 



कायद्याचा व पोलिस प्रशासनाचा शाक गावगुडाना राहीलेला नही अश्या नरायम कृत्य करणात्या आरोपीना अटक करून फाशीची सजा देण्यात यावी व त्यासाठी उज्वल निकम सारखा सरकारी वकील नेमण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केली आहे. यावेळी दिलीप नाईक, समाधान कांबळे, मनोज कांबळे, भारत दातार, आसिफ शेख, मुमताज पठाण, सुमन पाटील, रखमाबाई आदी उपस्थित होते.          


थोडे नवीन जरा जुने