नवी मुंबई पोलीसांकडुन Dial 112 प्रमोशन कार्यक्रम उत्साहात साजरा.






पनवेल दि.१३(संजय कदम): नवी मुंबई पोलीस दलातर्फे नवी मुंबईत कार्यान्वीत करण्यात आलेली 'डायल ११२' या प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवेची नागरीकांसाठी विस्तृत माहिती व जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्फत आज सिडको एक्झीबीशन हॉल, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी "डायल ११२ प्रमोशन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




     सदर कार्यक्रमामध्ये नागरीकांना आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक डायल ११२' वर व्हाईस कॉल, एसओएस, एसएमएस, ई मेल, वेब विनंती आणि पॅनीक बटणाद्वारे मदतीची विनंती केल्यास तात्काळ विनाविलंब महाराष्ट्र पोलीसांकडुन वर्षामध्ये ३६५ दिवस २४ तास पुरविण्यात येणा-या डायल ११२ या प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवेची मुख उद्दीष्टे ध्येय व वैशिष्टे तसेच संपूर्ण प्रक्रियेची कार्यपद्धती याबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात आली. नमूद कार्यक्रमामध्ये नवी मुंबईतील विविध शाळेतील ३०० विद्यार्थी, ३५० सुजाण नागरीक असे एकुण ६५० नवी मुंबईकरांनी सहभाग घेतला होता.



 नवी मुंबईतील नागरीकांमध्ये डायल ११२ या नंबर विषयी प्रसार व जनजागृती व्हावी याकरीता ५ सुसज्ज वाहने त्यावर डायल ११२ पोस्टर्स लावून सतत ३ दिवस नमूद वाहने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध भागामध्ये मुख्यत्वे करून ज्या ठिकाणी नागरीकांची गर्दी होते अशा ठिकाणी गस्त करून प्रसार व जनजागृती करणार आहेत. तसेच मुख्यत्वे ठिकाणी ४१,५०० पोस्टर्स लावून देखील लोकांमध्ये डायल ११२ या नंबरविषयी प्रसार व जनजागृती करण्यात येईल. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांचे हस्ते झेंडा फडकावत डायल ११२ वाहनांना नवी मुंबई मधील नागरीकांमध्ये जनजागृती करीता पाठविण्यात आले. त्यावेळी सभागृहात दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.



 सदर कार्यक्रमास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ विवेक पानसरे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय संजय कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा तिरूपती काकडे व डॉ.क्टर प्रिती टिपरे, यांच्यासह महापे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. नवी मुंबई पोलीसांतर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदत हवी असल्यास 'डायल ११२' वर कॉल करावा.



थोडे नवीन जरा जुने