पनवेल दि.२६ (वार्ताहर) : मानसिक तणावातून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावाच्या एका चाळीत घडली आहे.
खैरणे गावाच्या एका चाळीत राहणारे रुपला रेख्या राठोड (वय ४२ वर्षे) याच्यावर गेल्या काही दिवसापासून मानसिक उपचार सुरु होते. त्याच्या नैराश्यातून व आजाराच्या तणावातून सदर इसमाने राहत्या घरातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Tags
पनवेल