पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह






पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह
पनवेल दि.२६ (संजय कदम) : पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. 



        सदर इसमाचे अंदाजे वय ३२ ते ३५ वर्षे असून त्याचा चेहरा उभट, बारीक दाढी, डोक्याचे केस बारीक काळे आहे. तसेच त्याच्या डाव्या हातावर साप, फुल, ओम, त्रिशुल, विंचू असे गोंदलेले आहे.


 तरी सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधावा. 

  

थोडे नवीन जरा जुने