नावडे काॅलनीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी






नावडे काॅलनीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेबआंबेडकर सामाजिक संस्था, नावडे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फूले यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या जल्लोष पूर्ण वातावरणात नावडे काॅलनी मध्ये साजरा करण्यात आला. यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली. या जयंती चे विशेष म्हणजे जयंती च्या मिरवणूकीत फक्त बौद्ध बांधवच नव्हे तर इतर समाजातील तरूण वर्गाने देखील प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व धर्म समभाव जोपासत नृत्य करीत मिरवणूकीची शोभा वाढविली.



             यापूर्वी सकाळी बौद्धाचार्य जोशी गुरूजी यांनी सूत्र पठन व बुद्ध पुजा, घेऊन प्रवचन दिले. यावेळी अनेक स्थानिक सन्मानिय ग्रामस्थ सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी व मुख्य अतिथी मा.नगरसेवक अरविंद म्हात्रे उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नंतर मुलांच्या व स्रियांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले. डाॅ.अपर्णा गायकवाड यांनी उत्कृष्ट पणे सूत्र संचालन केले. यानंतर मुला-मुलींची विविध नृत्य व नाट्यीकरण सादर करण्यात आले. यानंतर प्रमुख वक्त्यांचे प्रवर्चन झाले व त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.



 सायंकाळी फुलांनी सजलेली ट्रकमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मूर्ती मुख्य आकर्षण होते. तसेच फुलांनी व रंगीत दिव्यांनी सजावट केलेल्या आकर्षक रथामध्ये तथागत गौतम बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फूले यांच्या मुर्ती व प्रतिमा ठेऊन डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखी अभूतपूर्व गर्दीने. भव्य मिरवणूक काढण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व पोलीस प्रशासनाचे सर्व नियमांचे पालन करून दिलेल्या वेळेपूर्वीच मिरवणूक संपन्न झाली.मा.आमदार बाळाराम पाटील जयंती मिरवणूकीत सामील झाले.




या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आयु.विलास गायकवाड उपाध्यक्ष भिमराव कांबळे,सचिव सुदेश शिंदे,सहसचिव प्रमोद गजहंस,खजिनदार गोरख अहिरे सह खजिनदार धर्मेंद्र अहिरे,सल्लागार राजाराम कांबळे, हिशोबनीस संजय गायकवाड सदस्य अॅड.सविताताई गायकवाड, डॉ. अपर्णाताई गायकवाड व सर्व कमिटी पदाधिकारी/सदस्यांसह जयंती उत्सव कमिटी चे कार्याध्यक्ष आयु तानाजी लोखंडे, आयु.चंद्रकांत नरवाडे, आयु. प्रकाश गायकवाड, आयु. विशाल गायकवाड, आयु. तरकसे बाबा, आयु. राहूल ठोंबरे आयु. अनिल पगारे, आयु. कसबे साहेब, डाॅ. किर्तीकुमार बनसोडे, रविंद्र मोरे, विजय मोरे, अखिल गोरखडे, सागर जगताप, सचिन गायकवाड सुमित गायकवाड प्रतिक गायकवाड, शुभम अहिरे, आबा अहिरे या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सामाजिक कार्यकर्ते आयु. सुभाष गायकवाड़, आयु. नसिब गायकवाड़ सदर जयंती महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे संस्थेचे अध्यक्ष आयु. विलास गायकवाड यांनी आभार मानले.




थोडे नवीन जरा जुने