सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीचे विनयभंग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीचे विनयभंग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल  
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून शरीराचे अश्लील भाग दाखवले व शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           १४ वर्षीय तरुणीच्या इन्स्टा आयडी अकाउंटवर राणी राठोड २००० या इन्स्टा आयडीवरून मैत्रिणीचा फोटो पाठवला व तिची मैत्रीण असल्याचे भासवून व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. व्हिडीओ कॉल सुरू केल्यावर शरीराचे अश्लील भाग दाखवून शारीरिक सुखाची मागणी केली व या व्हिडीओचा स्क्रीनशॉट काढून पीडित तरुणीच्या इतर मित्र-मैत्रिणींचे इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल केला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी तळोजा पोलिस अधिक तपास करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने