रेल्वे प्रवासात सीटवर झोपणाऱ्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष केंद्रित; तीन प्रवाशांचे मोबाईल केले लंपास

रेल्वे प्रवासात सीटवर झोपणाऱ्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष केंद्रित; तीन प्रवाशांचे मोबाईल केले लंपास
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : रेल्वे प्रवासात सीटवर झोपणाऱ्या प्रवाशांवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले असून पनवेल हार्बर मार्गावर लोकल रल्वेत सीटवर झोपलेल्या तीन प्रवाशांचे मोबाईल पळवून नेले आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


    
          विचुंबे येथील राजेशकुमार मीना यांचा ३३ हजार रुपयांचा मोबाइल, गोपाळ शर्मा यांचा ११ हजार रुपयांचा मोबाइल व पनेवलमधीलच रोशन मंडल यांच्याकडील मोबाइलही लोकलमधील प्रवासात चोरीला गेला आहे. पनवेल हार्बर लोकल रल्वेत सीटवर झोप लागलेली असताना चोरट्यांनी या तिघांचे मोबाइल पळवून नेले. याविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान रेल्वेमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात येते.


थोडे नवीन जरा जुने