वारद येथे अखंड भक्तीरसामृत यज्ञोत्सवाचे आयोजन, ह.भ.प. हनुमंत विष्णू लभडे यांचा संकल्पनेतून







वारद येथे अखंड भक्तीरसामृत यज्ञोत्सवाचे आयोजन, ह.भ.प. हनुमंत विष्णू लभडे यांचा संकल्पनेतून


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २६ एप्रिल, 


                       
              रायगड भूषण ह.भ.प. रामदास ( भाई ) महाराज पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली ह.भ.प.हनुमंत विष्णू लभडे यांच्या संकल्पनेतून द्वितीय वर्षी अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव वारद येथे आयोजन करण्यात आले असून, हे दुसरे वर्ष असल्यामुळे या ठिकाणी वारकरी,सामाजिक सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय,शासकीय कर्मचारी यांनी या ठिकाणी हजेरी लावून या यज्ञोत्सवाचा आनंद घेतला. 



                  पाहटेपासून या ठिकाणी भक्तीमय वातावरण निर्माण झाल्यांचे पहावयास मिळाले आज पहिलाच दिवस असल्यामुळे सकाळी काकडा आरती,ज्ञानेश्वरी पारायण,भजनांजळी,प्रवचन,हरिपाठ,कीर्तन,जागर भजन अदि कार्यक्रम या यज्ञोत्सवाच्या ठिकाणी होत आहे.तसेच या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार यांचे कीर्तन रोज रात्री ९ ते ११ कीर्तन होणार आहेत 



पहिल्या दिवशी ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील ( भाषाप्रभू भिवंडी )गुरुवारी ह.भ.प.नरेंद्र महाराज गुरव (झी टॉकीज फ्रेम मालेगांव )तसेच शुक्रवार काल्यांचे कीर्तन गुरुवर्य - ह.भ.प.रामदास (भाई )महाराज पाटील गुरुकुल - महड ) त्याच बरोबर गुरुवारी दीपोत्सवाच्या माध्यमातून या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.






                हा कार्यक्रमाचे आयोजन हनुमंत विष्णू लभडे यांच्या संकल्पनेतून व ज्ञानेश्वर महाराज पाटील (खानाव )यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामस्थ,महिला व तरूण मंडळ वारद यांच्या सहकार्य लाभले आहे.


थोडे नवीन जरा जुने